खानापूर तालुक्यातील हलशी येथील प्रसिद्ध नृशिंह वराह मंदीरात गुरुवारी रात्री करण्यात आली आहे त्यामुळे भाविक आणि ग्रामस्थांत संतापाचे वातावरण पसरले आहे तसेच पुरातत्व खात्याच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
हलशी हे कदंबकालीन गाव असून 12 व्या शतकातील अनेक प्रशिद्ध मंदिरे गावात आहेत. तसेच चार दिवसांपासून गावात यात्रोत्सव सुरू आहे त्यामुळे मंदिरात गर्दी होत आहे तसेच मंदिर परिसरात व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली आहेत तरीही मंदिरात चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत नंदगड पोलीस स्थानकाला माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक सीमा नाईक यांनी पाहणी केली आहे तसेच बेळगाववरून डॉग स्कॉड मागवून पाहणी करण्यात येणार आहे त्यामुळे मंदिर बंद करण्यात आले आहे. मंदिर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.