कर्नाटक होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशनच्या बेळगाव शाखेचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत फौंड्री क्लस्टर येथे पार पडले. उदघाटन समारंभाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी,के एल ई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.प्रभाकर कोरे,व्ही आर एल ग्रुपचे डॉ.विजय संकेश्वर ,डॉ.विरब्रह्माचार्य आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बेळगाव शाखेचे अध्यक्ष डॉ.आर.वाय. नदाफ यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.
मंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते बेळगाव शाखेचे उदघाटन करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि डॉ सॅम्युअल हेनमन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणात होमिओपॅथीच्या उपयुक्ततेवर प्रकाश टाकला.मंत्री सुरेश अंगडी यांनी सरकारतर्फे आवश्यक ते सहकार्य करण्याची घोषणा केली.
उदघाटन कार्यक्रम झाल्यावर होमिओपॅथी तज्ज्ञांचे चर्चासत्र झाले.या चर्चासत्रात मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
#karnatakahomeopathicbelgaumbranch