महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यात लिंगायत मतदारांची संख्या लक्षणीय आहे.ही लिंगायत मते भाजपकडे वळविण्यासाठी भाजपने मास्टर प्लॅन तयार केला आहे.कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यात प्रचारासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
मुंबईतील तुळू भाषिकांना आकृष्ट करून घेण्यासाठी देखील कर्नाटकातील किनारपट्टी प्रदेशातील आमदारांना प्रचारासाठी निमंत्रित केले जाणार आहे.येडीयुरप्पा हे लिंगायत समाजातील प्रभावशाली आणि वजनदार नेते मानले जातात.त्यांची लिंगायत समाजात लोकप्रियता देखील मोठी आहे.त्यामुळे भाजप हाय कमांडने येडीयुरप्पा यांना महाराष्ट्रात प्रचारासाठी दि.15 आणि 16 तारखेला तेरा जिल्ह्यात प्रचारासाठी बोलविण्याचे निश्चित केले आहे.
कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील अनेक विधानसभा मतदारसंघात भाजपचा प्रचार करण्यासाठी बेळगावातील अनेक भाजप कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या रवाना झाल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातील मंत्री लक्ष्मण सवदी अनेक मंत्री देखील प्रचार कार्यात सहभागी होणार आहेत.