सोलापूर जिल्ह्यातील कन्नड भाषिकांची संख्या जाणून घेत महाराष्ट्र भाजपने कर्नाटकातील अनेक नेत्यांना सोलापूर जिल्ह्यात प्रचार कामाला उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर उत्तर सोलापूर दक्षिण अक्कलकोट पंढरपूर मंगळवेढा तुळजापूर जत उस्मानाबाद आणि मिरज या मतदारसंघात प्रचार करणार आहेत.
मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा, मंत्री के एस ईश्वरापा,लक्ष्मण सवदी,जगदीश शेट्टर,शशिकला जोल्ले,रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी,विजापूरचे बसनगौडा पाटील यत्नाल, हे अनेक जाहीर सभा घेणार आहेत. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकातील भाजप नेत्यांच्या प्रचार सभांचे समन्वय साधला जाणार आहे.
बेळगावातील भाजप नेते किरण जाधव यांच्या कर्नाटक भाजप आणि महाराष्ट्र भाजप नेत्यांच्या प्रचार सभांची नियोजन जबाबदारी सोपवण्यात आली आहे.जाधव हे दोन्ही राज्यातील भाजप नेत्यांशी संपर्क ठेऊन सभांचे नियोजन करणार आहेत.