पुणे बेंगलोर रोड वर अलारवाड क्रॉस पासून न्यू गांधी नगर च्या दिशेकडे शामजी पेट्रोल पंप पर्यंत सर्व्हिस रोड आहे की पार्किंगचे ट्रक टर्मिनल असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व्हिस रोडवर पेट्रोल पंप शेजारी असलेल्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे ट्रक पार्क करत असल्याने ये-जा करण्यास इतर वाहनांना अडथळा निर्माण होत.
दोन ट्रान्सपोर्ट कंपन्या आहेत त्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांत आलेले ट्रक 24 तास या सर्विस रोड थांबलेले असतात प्रत्येक वेळी किमान पंचवीस ते तीस ट्रक येथे पार्क केलेल्या असतात त्यामुळे या सर्विस रोड वरून ट्रान्सपोर्ट बेळगाव कडे जाणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
या भागातील सामाजिक कार्यकर्ते आणि हलगा ग्राम पंचायतीच्या सदस्यांनी याबाबत ट्रान्सपोर्ट मालकाला रहदारी अडथळा होत ट्रक थांबवू नये अशी विनंतीही केली अस ता याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.बेळगाव रहदारी उत्तर पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात ही जागा येत असून पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे व बेकायदेशीर ट्रक पार्किंग टर्मिनस वर बंदी आणावी अशी मागणी केली जात आहे.हा सर्व्हिस रोड कधी मोकळा श्वास घेईल जेणे करून इथून ये जा करणाऱ्या वाहनांना त्रास होणार नाही याची काळजी पोलिसांनी घ्यावी लागेल.
जुने बेळगाव ओल्ड पी बी रोड वर देखील एका खाजगी आराम बस कंपनीच्या गाड्या बेकायदेशीर रित्या पार्क केलेल्या असतात याकडेही पोलिसांनी लक्ष देण्याची गरज बनली आहे