दीपावली आली की शहर आणि परिसरात साऱ्यांना वेध लागतात ते गडकिल्ल्यांच्या उभारणीचे. शहर आणि परिसरात इतिहासाची पुनरावृत्ती करणारे बरेच किल्ले उभारण्यात आले आहेत. मात्र ग्रामीण भागही मागे राहिला नाही बेळगाव तालुक्यातील कल्लेहोल येथे विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. यामुळे परिसरातील नागरिक हा किल्ला पाहण्यासाठी एकच गर्दी करू लागले आहेत.
शिवरायांचे किल्ले बनविण्याची भावना त्यांची कल्पकता, स्वराज्यावर धावून येणार्या शत्रूपासून स्वराज्याचे रक्षण करण्याची क्षमता, मावळ्यांच्या साथीने दुश्मन यांचा पाडाव करण्यासाठी त्यांनी वापरलेले गनिमी कावा आजही अजरामर आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात गड उभे करण्याची आवड अजून जोपासली जाते. कल्लेहोल येथे मागील काही वर्षापासून विविध स्वरूपातील किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. यावर्षी विजयदुर्ग किल्ल्याची उभारणी करण्यात आली असून हुबेहूब किल्ला उभे करण्यात आल्याने हा किल्ला पाहण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत.
या किल्ल्यावर सतरा बुरुज दाखविण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने गणेश बुरूज राम बुरूज, हनुमंत बुरूज, गगन, सर्जा बुरूज, दर्या बुरूज, जखिन मंदिर, दारुकोठार दाखविण्यात आले आहेत,. या किल्ल्यासाठी जवळपास दोनशे चिरे, शेड, चुना, सिमेंट, दगड, माती त्याचबरोबर इतर साहित्य बांधकाम करण्यासाठी वापरण्यात आले आहेत.
किल्ल्याच्या तीन बाजूला फेसाळणारा समुद्र एका बाजूने जमिनीचा भाग दाखविण्यात कार्यकर्त्यांनी बरेच परिश्रम घेतले आहेत. विठ्ठल गल्लीतील जवळपास 30 ते 40 युवक दसरा उत्सव संपतात वेगवेगळ्या व्यवसायात गुंतले असले तरी किल्ला उभारण्यासाठी त्यांनी रात्रीच्या वेळी सर्व जण जमून हा किल्ला उभे केला आहे.
अनेक युवक इतिहासापासून दूर जात असताना कल्लेहोल येथील युवकाने हा किल्ला उभे करून अनेकांना प्रोसाहन देण्याचे काम केले आहे. समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना केलेले वर्णन आजही अनेकांना माहिती आहे.मात्र गड उभारणीसाठी या युवकांनी केलेले प्रयत्न अनेकांना प्रेरणा देणारी ठरते. हा गड पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहेत. विशेष म्हणजे मध्यंतरी सुरू असलेल्या दमदार पावसातही त्यांनी या गडाची उभारणी केल्याने अनेक कांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.