65व्या वन्यजीवी सप्ताहा निमित्त वन खात्याच्या वतीने आयोजित सायकल रॅलीस मराठा इंफंट्रीचे डिप्टी कमांडट कर्नल पी एल जयराम यांनी चालना दिली. फॉरेस्ट खात्याच्या कंपाऊंड मधून या सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली.
वन खात्याच्या कंपाउंड पासून संती बस्तवाड येथील सिटी फॉरेस्ट पार्क पर्यंत सायकल फेरी काढली मराठा सेंटरच्या जवानांनी हातात वन्य जीवींचे रक्षण करा या मागणीचे जागृती फलक घेत जागृती केली वन अधिकारी कर्मचारी देखील सहभागी झाले होते. दोन वेळा मराठा सेंटरच्या जवानांनी रॅली काढली आहे.
सी सी एफ बी बी करुणाकर डी एस एफ अमरनाथ ए सी एफ एस एम संगोळळी आदी वन अधिकारी यावेळी उपस्थित होते. निवृत्त एअर कामोडोअर हिरेमठ यांनी सायकल चालवत वन्य जीवांचे महत्व पटवून दिले.