बेळगावातील ए पी एम सी मार्केट मध्ये रताळ्याना योग्य भाव मिळावा अशी मागणी करत संतप्त शेतकऱ्यांनी गेट बंद आंदोलन करत निषेध व्यक्त केला.बुधवारी दुपारी तीन ते चार वाजे पर्यंत तब्बल एक तास वेळ ए पी एम सी दोन्ही मुख्य गेट बंद करत आंदोलन केले.
रताळी 1800 रुपये प्रति क्विंटल दर होता मात्र आज अचानक 1100 रुपये एवढा घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी दोन्ही गेट बंद करत आंदोलन सुरू केलं यावेळी गेट बंद झाल्याने व्होलसेल भाजी मार्केट मधून बाहेर येणारी आणि आत जाणारी वाहने अडकल्याने जाम झाला होता.आंदोलन स्थळी ए पी एम सी पोलीस निरीक्षक जे एम कालीमिरची यांनी धाव घेऊन शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला शेवटी ए पी एम सी अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं.
ज्यावेळो कांदा असो बटाटा असो किंवा रताळी असोत दर घसरला की शेतकरी आक्रमक होऊन आंदोलन करत असतात गेट बंद करतच असतात याअगोदर गेट बंद आंदोलन वेळी भाजी मार्केट नव्हते आता भाजी मार्केट ए पी एम सी मध्ये असल्याने थोडा वेळ जरी गेट बंद झाला तर ओल्या भाजी पाल्यावर याचा परिणाम होत असतो.
नेहमी प्रमाणे शेतकऱ्यांच्या तोंडाला आश्वासनांची पाने पुसल्याने गेट आंदोलन मागे घेतलं गेलं मात्र रातळ्यांचे दर समान रहाणार का हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.