कोजागिरी पौर्णिमेनिमित्त शेतात पूजा करण्यासाठी गेलेल्या निलजी येथील युवकाचा पाण्यात पाय घसरून पडल्याने दुर्दैवी अंत झाल्याची घटना आज सकाळी घडली. पुन्नाप्पा कल्लाप्पा मनुरकर (वय 35 ) असे युवकाचे नाव आहे.
निलजी शिवारात सकाळी आठ वाजता ही दुर्दैवी घटना घडली.
पुन्नाप्पाला पोहता येत नव्हते शिवाय अति पावसामुळे या भागात चिखलानी दलदल निर्माण झाली होती. यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. आपल्या लहान मुलाला घेऊन तो शेतात गेला होता काही अंतरावर मुलाला ठेऊन तो दुसऱ्या शेतात मेरे वरून जात असताना होळेतील पाणी दहा ते बारा फूट खोल खड्डा निर्माण झाला होता त्या खड्डयात पाय घसरून पडला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पूजेसाठी शेतात गेलेला पुन्नाप्पा हा परत आला नसल्याने त्याचा शोध घेतला असता शेतातील खड्डयात त्याचा मृतदेह आढळला. गावातील काही साहसी युवकांच्या प्रयत्नाने त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. मारिहाळ पोलिसांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. घटनेची नोंद मारिहाळ पोलिसात झाली आहे.
तो सेंट्रींग कामाबरोबरच शेती हा व्यवसाय सांभाळत घराचा चरितार्थ चालवत होतो. त्याच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, 2 मुले, बहिणी असा परिवार आहे.