यावर्षी उद्भवलेल्या पूरपरिस्थितीने आपल्या शेतीचे अतोनात नुकसान झाल्यामुळे खचलेल्या शेतकऱयाने मृत्यूला कवटाळले. हा प्रकार बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी येथे घडला.
मारुती नारायण राक्षे (वय 60 रा. मारुती गल्ली, आंबेवाडी) असे या शेतकऱयाचे नाव आहे. विषप्राशन करून त्याने आत्महत्या केली आहे. अतिवृष्टीमुळे राक्षे यांच्या शेतीमधील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.
मारुती यांच्या भात व बटाटा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे गेल्या आठवडा भरा पासून ते मानसिक तणावाखाली वावरत होते सोमवारी सकाळी त्यांनी विष प्राशन केले होते घरच्या ना याची कल्पना येताच त्यांनी उपचारासाठी त्यांना इस्पितळात दाखल केले होते उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.मंगळवारी त्यांच्यावर अंतिम संस्कार झाले
सरकारने पुरात झालेल्या नुकसानीची भरपाई न दिल्याने शेतकरी नाराज आहेत त्यातच शेतकरी नाराज झाले आहेत.या मयत शेतकऱ्यांच्या परिवाराला नुकसान भरपाई देण्याचो मागणी केली जात आहे.
#farmersuicidebelgaum
#belgaumruralconstituencyfarmers
#ambewadivillage
#belgaumliveupdates