चुकीची माहिती पसरवून अफवा आणि गोंधळ निर्माण करणारे सोशल मीडियावर वाढत आहेत. सध्या अशाच एक रेल्वेला धडक बसलेल्या हत्तीचा फोटो व्हायरल करून गोंधळ घातला जात आहे.लोंढा भागात अशी घटना घडलेलीच नसताना हा गोंधळ घालणाऱ्यांनी दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
वन्यजीव कार्यकर्त्यांचे काळीज हलवून टाकणारा हा व्हिडीओ आहे. जखमी हत्ती आणि रेल्वेचा मोडलेला समोरचा भाग हे चित्र दुःखदायक आहे. यामुळे अनेकांनी वन कर्मचारी व अधिकाऱ्यांना संपर्क करून या घटनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी तर लोंढा वन विभागाच्या भागात जाऊन घटनेचा खरेपणा समजून घेण्याचाही प्रयत्न केला.
लोंढा आर एफ ओ एस एस निंगाणी यांच्याशी संपर्क केल्यावर आपल्याला अनेक कॉल आले आहेत. सोशल मीडियावर पसरविले जात असलेल्या खोट्या छायाचित्र व व्हिडीओ मुळे असे घडत आहे.असे त्यांनी सांगितले.
घटनेची पडताळणी केल्यास ही घटना पश्चिम बंगाल येथे घडली असून बेळगाव जिल्ह्याशी या घटनेचा संबंध नसल्याचे उघड झाले.
आणखी एक घटनेत सोशल मीडियावर आपल्या मित्राचा फोटो घालून आर आय पी असे लिहिण्यात आल्याने गोंधळ उडाला होता. अशा घटनांनी समाजात अफवा पसरत आहेत. नागरिकांनी असे न करता मेसेज आल्यास तो खराच आहे की नाही हे पाहून पुढे पाठवावा.