जिल्ह्यात दुर्गामाता मिरवणूक मोठ्या उत्साहात झाली तर काही ठिकाणी गालबोट लागले. तर काही ठिकाणी अपघात ही झाले आहेत. कागवड येथे काढण्यात आलेल्या दुर्गामाता मिरवणुकीत ट्रॅक्टर घुसल्याने बालकासह तिघे जण ठार झाले असून चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सचिन कलगोंडा पाटील वय 40 संजीव रावसाहेब पाटील वय 35 आणि बालक हुसन गुलपन्नावर 5 असे या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास हा अपघात घडला असून अपघातानंतर एकच गोंधळ माजला आहे. अंधार असल्यावेळी हा अपघात घडला आणि त्यानंतर एकच धावपळ उडाली.
कृष्णा नदीच्या दिशेने येथील पाटील गल्ली दुर्गामाता मिरवणूक निघाली होती. ट्रॅक्टर वरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर थेट मिरवणुकीत घुसला. यामध्ये वरील तिघेजण ठार झाले आहेत. हा अपघात घडल्याने सारेजण भीतीच्या छायेखाली आहेत. अचानक घडलेल्या या अपघातामुळे सारेजण सैरावैरा पळू लागले होते.
कागवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला आहे. ट्रॅक्टरचा ब्रेक निकामी झाल्याने ट्रॅक्टर मिरवणुकीत घुसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तिघे जण ठार झाले असून चार जण जखमीझाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मोठ्या उत्साहात दुर्गामाता मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र घडलेल्या अपघातानंतर एकच गोंधळ माजला.