आणखी काही दिवस पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.कृष्णा आणि मलप्रभेच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.पावसामुळे जिल्ह्यातील जनतेने घाबरण्याची आवश्यकता नाही.
जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती खबरदारीची उपयाययोजना केली आहे.पूरग्रस्त भागातील जनतेला देखील सगळ्या सोयी पुरविण्यात आल्या आहेत.
अधिकाऱ्यांनी सगळ्या ठिकाणची पाहणी केली आहे.तालुका पातळीवर तहसीलदार,महसूल खात्याचे कर्मचारी यांच्याशी जनतेने संपर्क साधावा.पोलीस खातेही सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी एस.बी.बोमनहळ्ळी यांनी सांगितले.