बदलणारे युद्धतंत्र अवलंब करणे काळाची गरज आहे.आधुनिक युद्धतंत्राचा स्वीकार जे करत नाहीत त्यांची पीछेहाट होते असे मत लेफ्टनंट जनरल आणि मराठा लाईट इन्फंट्री चे कर्नल ऑफ द रेजिमेंट असित मिस्त्री यांनी व्यक्त केले.सोमवारी सकाळी बेळगावातील मराठा रेजिमेंटला भेट दिल्यावर बोलत होते.
कर्नल ऑफ दि रेजिमेंटची सूत्रे स्वीकारल्या नंतर ते पहिल्यांदाच बेळगावला आले होते.भारतीय लष्कर नेहमी आधुनिक युद्धतंत्राचा स्वीकार करत आले आहे.त्यामुळे अद्ययावत माहिती आणि तंत्रज्ञान याची माहिती सैन्याला मिळते.नव्या युद्धतंत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा सहभाग मोठा आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास लष्कराने अगोदरच प्रारंभ केला आहे.नव्याने सैन्यात दाखल होणारे जवान देखील टेक्नोसॅव्ही आहेत.त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे त्यांना सोपे जाते.नवीन तंत्रज्ञान स्वीकारून त्याचे प्रशिक्षण अधिकारी जवानांना दिले जाते असेही ते म्हणाले
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये जवानांना उत्कृष्ट प्रशिक्षण दिले जाते.येथे दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा दर्जा अव्वल आहे.प्रशिक्षणासाठी अत्यंत उच्च दर्जाच्या सुविधा आहेत असं देेेखील त्यानी पत्रकारांशी संवाद साधताना नमूूद केलं.
लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री यांचे आगमन होताच मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर चे कमांडन्ट ब्रिगेडियर गोविंद कलवड यांनी स्वागत केले.नंतर मिस्त्री यांना मानवंदना देण्यात आली.यावेळी युद्ध स्मारकाला भेट देऊन मिस्त्री यांनी पुष्पचक्र अर्पण करून युद्धात हौतात्म्य पत्करलेल्याना श्रद्धांजली अर्पण केली.नंतर जवान, अधिकारी आणि सेवानिवृत्त जवान, अधिकारी यांच्याशी त्यांनी संवाद साधला.
इतिहास समजावून घेण्याचे कार्य म्युजियम करतात:लेफ्टनंट जनरलकडून म्युजियमचे कौतुक
वस्तू संग्रहालये हा रेजिमेंटचा महत्वाचा भाग आहे.वस्तू संग्रहालयामुळे भावी पिढीला पूर्वीच्या पिढीच्या कर्तृत्वाची ओळख होते.इतिहास समजावून देण्याचे कार्य वास्तुसंग्रहालयामुळे होते .त्यामुळे प्रत्येक रेजिमेंटमध्ये वस्तू संग्रहालयाचे स्थान महत्वाचे असते असे लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री यांनी मराठाचे वस्तू संग्रहालयाची पाहणी केल्यानंतर आपले मत व्यक्त केले.मराठा सेंटरचे पुरस्कार विजेते पैलवान आणि मुष्टियोद्धे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.