मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे राजकीय सचिव शंकरगौडा पाटील यांनी जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन विविध भागांची पाहणी करून तेथील दुरावस्थेबद्दल अधिकारी कळसद आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.जिल्हा रुग्णालयाला यायची लाज वाटते.असे हॉस्पिटल ठेवतात काय म्हणून फोनवरून शंकरगौडा पाटील यांनी कळसद यांना सुनावले.परत भेट देईन त्यावेळी सुधारणा दिसली पाहिजे अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशाराही पाटील यांनी दिला.
बाळंतपणासाठी येणाऱ्या महिलांना जमिनीवर झोपवले जाते.एम आर आय सिटी स्कॅनिंग मशीन देखील आणले आहे पण अद्याप ते सुरू केलेले नाही अशी माहिती विजय मोरे यांनी पाटील यांना दिली.सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते आणि तुम्ही काय काम करता असा सवाल कर्मचारी आणि डॉक्टरना केला.पाण्याचे फिल्टरही बंद पडले आहे.
स्वच्छतागृहांची स्वच्छता राखली जात नाही हे देखील पाटील यांच्या निदर्शनास तेथील रुग्णांनी आणून दिले.रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपहाराची पाहणी केली असता ते निकृष्ट दर्जाचे आहे हे पाहिल्यावर पाटील चांगलेच संतापले होते.