belgaum

मुख्यमंत्र्यांनी केलं पुरग्रस्तांचे पुनर्वसन

0
211
Cm bsy
 belgaum

पुरामध्ये संपूर्ण घराचे नुकसान झालेल्या पुरग्रस्तांना नवीन घर बांधण्यासाठी आवश्यक ती परवानगी पत्रे मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांच्या हस्ते विविध तालुक्यातील पुरग्रस्तांना देण्यात आली तसेच बांधकाम सुरू करण्यासाठी एक लाख रुपयांची रक्कम पूर ग्रस्तांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.

जिल्हा पंचायतीच्या सभागृहात झालेल्या पुरग्रस्तांच्या मदत कार्याच्या आढावा बैठकीत विविध अधिकाऱ्यां कडून मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.

Cm bsy

 belgaum

पूर आलेल्या वेळी कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेल्या पी एस आय ची पत्नी कस्तुरी लठ्ठे यांना मुख्यमंत्री मदत निधीतून 20 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांच्या हस्ते देण्यात आला.

मुख्यमंत्री मदत निधीला 1.90 कोटींचा चेक वायव्य कर्नाटक परिवाहन निगम तर्फे पूर ग्रस्तांना मदत देण्यात आली आहे त्यांच्या तर्फे 1.90 कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्या कडे सुपूर्द करण्यात आला. या बैठकीत उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी गोविंद कारजोळ यावेळी जिल्ह्यातील आमदारांनी अनेक समस्या मुख्यमंत्र्यां समोर मांडल्या. भाड्याच्या घरात राहणाऱ्या पूर ग्रस्तांना कोणत्याही तऱ्हेची मदत मिळाली नाही याकडे खानापूरच्या अंजली निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.