पुरग्रस्तांच्या मदत कार्याचा आढावा घेण्यास बेळगावात आलेल्या मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी शुक्रवारी सकाळी सर्किट हाऊसच्या आवारात मॉर्निंग वॉक केला.सकाळी उठल्यावर ग्रीन टी त्यांनी घेतला.
नंतर सगळ्या वृत्तपत्रांवर एक नजर फिरवली आणि वाकिंगला बाहेर पडले.दररोज सकाळी ते सहा वाजता वाकिंगला बाहेर पडतात पण आज एक तास उशिरा म्हणजे सकाळी सात वाजता ते वाकिंगला बाहेर पडले.यावेळी त्यांनी पाच फेऱ्या मारल्या.त्यांच्या समवेत माजी आमदार संजय पाटील,एम बी झिरली,राजू चिकनगौडर आदी होते. शुक्रवारी सकाळी ते अथणी कडे रवाना झाले आहेत.
पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर गेल्यामुळे केंद्राकडून पुराग्रस्तासाठी मदत मिळण्यास उशीर झालाय.तीन चार दिवसात केंद्राकडून मदत निधी मिळणार आहे.केंद्राकडून निधी मिळाला नाही म्हणून कोणतेही मदत कार्य,पुनर्वसन कार्य थांबले नाही.केंद्राने अजून कोणत्याही राज्याला निधी दिलेला नाही असे येडीयुरप्पा म्हणाले.