दरवर्षी विजयादशमीला बेळगाव आणि परिसरातील पालख्या कॅम्प येथील मराठी विद्यानिकेतनच्या मैदानावर येत असतात. बेळगावकरांच्या वतीने या ठिकाणी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होतो.या ठिकाणी पडलेल्या कचऱ्याची उचल करत जायंटस ग्रूपच्या सदस्यानी विद्या निकेतन मैदानावर स्वच्छता मोहीम राबवली.
सिममोल्लंघना वेळी अनेक खाद्यपदार्थाच्या गाड्या, स्टॉल्स त्याठिकाणी असतात. पण खाद्यपदार्थ खाऊन झाल्यावर रद्दीपेपर,प्लेट्स,चमचे,ग्लास इतर साहित्य मैदानावरच फेकले जातात गेल्यावर्षी पासून जायंट्सच्या वतीने डस्टबिनसुद्धा ठेवण्यात येत आहेत तरीसुद्धा त्याचा म्हणावा तसा उपयोग होताना दिसत नाही याचा अर्थ की स्वच्छतेच्या बाबतीत अजूनही म्हणावी तशी जागरुकता लोकांत झालेली नाही अशी खंत अशी खंत स्पे कमिटी सदस्य मोहन कारेकर यांनी व्यक्त केली.
जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून सीमोल्लंघन मैदानावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे
अध्यक्ष सुनिल भोसले यांनी प्लास्टिकचा वापर कमी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच काल झालेल्या पावसामुळे स्वच्छता करताना अडचणी आल्याचे सांगितले.
आज पहाटे पासूनच फेडरेशन संचालक मदन बामणे, माजी अध्यक्ष विकास कलघटगी, उमेश पाटील,विजय बनसुर,खजिनदार लक्ष्मण शिंदे, दिगंबर किल्लेकर, अजित कोकणे,राहुल बेलवलकर,राजु बांदिवडेकर,सुनिल चौगुले, प्रकाश तांजी,भाऊ किल्लेकर, धिरेंद्र मरलिहल्ली यांनी संपूर्ण मैदानाची स्वच्छता केली.