Thursday, December 26, 2024

/

शहरात जनावरे भटकी आणि कुत्र्यांची डोकेदुखी

 belgaum

स्वच्छ बेळगाव आणि सुंदर बेळगाव हे बेळगाव चे ब्रीद सध्या पुसत आहे. मनपाच्या अनागोंदी कारभार आणि योग्य नियोजन नसल्यामुळे या ब्रीद वाक्याचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे जर ब्रीद पुन्हा शहरात सर्वत्र दिसायचे असेल तर भटक्या जनावरांचा बंदोबस्त आणि कुत्र्यांचे लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यामुळे मनपाने कंबर कसणे गरजेचे बनले आहे.

बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. याच बरोबर भटक्या जनावरांमुळे रहदारीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी मनपाने पावले उचलण्याची गरज होती. मात्र याकडे साफ दुर्लक्ष करून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत.

भटक्या कुत्र्यांची टोळके रात्री-अपरात्री व पहाटेच्या सत्रात टोळक्याने शहरात फिरत असल्याने त्यांची दहशत तयार झाले आहे. महानगरपालिकेने मध्यंतरी त्यांचे लसीकरण मोहीम राबवली होते. मात्र ही मोहीम यशस्वी झाली आहे याची काही शाश्वती नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या दहशतीचे आणि अनेकांना त्यांनी घेतलेल्या चाव्यामुळे शहरातून फिरणे देखिल कठीण बनले आहे. अशा परिस्थितीत त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मनपाने कोणते पाऊल उचलणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

भटक्या जनावरांचे अशीच अवस्था झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर आपले बस्तान मांडल्यानंतर अनेकांना वाहतूक करताना समस्या निर्माण होत आहेत. अशीच अवस्था झाली तर शहरातील अनेक रस्त्यावर जनावरांचा वाढता उपद्व्याप डोकेदुखी ठरला आहे. विशेषकरून मॉर्निंग वापरणा-या कुत्र्यांच्या भीतीच्या छायेखाली वावरावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.