Saturday, January 18, 2025

/

1956 पासून काळा दिन तर 1963पासून राज्योत्सव

 belgaum

1 नोव्हेंबर 1956 पासून सीमाभागात हा दिवस काळा दिन म्हणून पाळला जातो. केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना म्हणून बेळगाव सीमाभाग म्हैसूर राज्यात अन्याय डांबण्यात आला. या वेळेपासून येथील जनता हा काळा दिन गांभीर्याने पळतात. मात्र आता काही कन्नड नेत्यांनी राज्योसव साजरा करण्याच्या प्रथेला जुनी प्रथा म्हणून संबोधत आहेत. मात्र कर्नाटक राज्योसव 1963 पासून साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यसभा आधी सीमाभागातील काळा दिनच पहिला असल्याचे दिसून येते.

भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर बॅरिस्टर नाथ पै, बा रा सुंठणकर, बाबुराव ठाकुर, महागावकर यांच्यासह अनेक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी 1 नोव्हेंबर 1956 पासून संयुक्त महाराष्ट्र चौकातून काळा दिनाच्या मूक सायकल फेरीला सुरुवात केली होती. ही परंपरा आजही तितक्याच ताकदीने मराठी माणूस सुरू ठेवली आहे. सीमाभागातील मराठी माणूस महाराष्ट्रात विलीन होईपर्यंत हा दिवस गांभीर्याने पाळणार यात शंका नाही. मात्र काही कन्नड संघटनांचे कुरघोडी नेते या दिवसाकडे वक्रदृष्टी टाकत आहेत. मात्र येथील मराठी जनता त्यांना भीक घालणार नाही यात शंका नाही.

1956 सालापासून सुरु असलेल्या काळा दिन आजही तितकाच गांभीर्याने आणि शांततेने केंद्र सरकारच्या विरोधात मूक सायकल फेरी काढून पाळला जातो. मात्र 1 नोव्हेंबर 1963 पासून काही सरकारी कार्यालयात राज्य दिन साजरा करण्यात येत होता. आता हुबळी धारवाडचा भरणा वाढल्याने बेळगावात मोठ्या प्रमाणात राज्य साजरा करण्यात येत आहे. मात्र या कर्नाटक सरकारला हे माहित नाही की ही जनता कर्नाटक भाषा विरुद्ध, कर्नाटक राज्य विरोध किंवा कन्नड संघटना विरोध मूक सायकल फेरी काढत नसून केंद्र सरकार विरोधात मूक सायकलफेरी काढते. त्यामुळे येथील मराठी जनतेला दुखल्यास ती कदापी गप्प बसणार नाही, याची झलक मूक सायकल फेरीतून दाखविण्यात येते.

तात्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी बेळगाव, निपाणी, कारवार डांग, उंबरगाव यांच्यासह इतर गुजरातच्या सीमावर्ती भागात भाषावार प्रांतरचना करून अनेक स्थानिक भाषिकांवर अन्याय केला. त्यावेळपासून गुजरात सह बेळगाव सीमा वरती भागात काळा दिन पाळला जातो. बेळगाव येथील स्थानिक भूमिपुत्र कडून ही परंपरा अखंड ठेवली गेली आहे. मात्र सध्या या काही कन्नड नेते याठिकाणी खंड पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मराठी जनता याला कधी मी भीक घालणार नाही, असे च्या सायकल फेरीतून दाखविण्यात येते.

कोविड मुळे यावर्षी मूक सायकल फेरी होणार नाही मात्र मराठा मंदिरात धरणे आंदोलन आणि ठीक ठिकाणी कोविड नियम पाळत कायद्याच्या चौकटीत लोकशाहीला अनुसरून धरणे व केंद्राचा निषेध केला जाणार आहे.

विशेष म्हणजे यावर्षी महाराष्ट्रातील मंत्री दंडाला काळ्या फिती बांधून एक दिवस कामकाज करणार आहेत तर अनेक राजकीय पक्षांनी देखील महाराष्ट्र पक्ष कार्यकर्त्यांना काळा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.