Friday, December 20, 2024

/

दुचाकीचालकाकडून पोलिसांनी उकळले पाच हजार

 belgaum

दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून पाच हजाराची लाच घेतल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.मित्रासमवेत पार्टी करून परत येत असताना पोलिसांनी त्यांना अडवून आणि भीती घालून त्यांच्याकडून पाच हजार रू उकळल्याची घटना घडली आहे.

दोन दिवसांपूर्वी हिंडलगा गणपती जवळ थांबलेल्या पोलिसांनी दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांना अडवले.पोलिसांनी अडवल्यानंतर त्या तरुणांनी आपण पार्टी करून आलो असून मद्य प्राशन केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना सोडण्यासाठी दहा हजार रू ची मागणी केली.यावेळी त्यांच्या मागून येणारे मित्रही तेथे थांबले.

अखेर तडजोड होऊन पाच हजार रू ला पोलिसांनी प्रकरण मिटवण्यास कबुली दिली.नंतर दोन मित्रांनी जाऊन पाच हजार रुपये आणून पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी त्या दोघांना सोडले.पोलिसांशी संपर्क साधला असता अशी कोणती तक्रार आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.