मागील दोन वर्षापासून तहसीलदार मंजुळा नाईक यांनी आपला पदभार स्वीकारला होता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे त्यांच्या जागी द्वितीय श्रेणी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून लवकरच ते पदभार स्वीकारणार आहेत
बेळगावच्या तहसीलदार म्हणून मंजुळा नाईक या कार्यभार सांभाळत होत्या सध्या बेळगाव जिल्ह्यातील तीन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली असून राज्यात 15 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्याने बरोबरच इतर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यावर राज्य सरकारने भर दिला आहे.
मंजुळा नाईक यांच्या जागी द्वितीय श्रेणी अधिकारी आर के कुलकर्णी यांची वर्णी लागली आहे. लवकरच ते बेळगाव तहसीलदार म्हणून आपला पदभार स्वीकारणार आहेत. तडकाफडकी बदली केल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. सध्या पोट निवडणूक होईपर्यंत तरी अनेक अधिकार्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. याचा विचार करून अनेक अधिकारी धास्तावले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मंजुळा नाईक यांनी मागील दीड ते दोन वर्षापासून आपला बेळगावातील कार्यभार सांभाळत आहेत. आता नवीन तहसीलदार म्हणून आर के कुलकर्णी हे पदभार घेणार आहेत त्यामुळे त्यांचा कार्यकाळ कसा राहील याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.