बेळगावची युवा जलतरण पटू इमानी पी जाधव हिने(फेडरेशन ऑफ इंडिया स्कुल गेम्स) राज्य स्तरीय जलतरण स्पर्धेत वैयक्तिक रित्या तीन सुवर्ण पदकांची कमाई करत घवघवीत यश संपादन केल आहे.
बंगळूर येथे 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या राज्य स्तरीय स्विमिंग स्पर्धेत 50 मीटर 100 मीटर आणि 200 मीटर बॅक स्ट्रोक या वैयक्तिक प्रकारात गोल्ड मेडलची कमाई केली आहे. तिने वैयक्तिक गोल्ड व्यतिरिक्त स्टेट मिडल रिले प्रकारात सांघिक कांस्य पदकाची कमाई देखील केली आहे.
या तिच्या तिन्ही गोल्ड मेडल्स मुळे पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय स्विमिंग स्पर्धेत तिची निवड झाली असून ती कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणार आहे.राष्ट्रीय स्पर्धेत इमानी 50,100व 200 मीटर बॅकस्ट्रोक व फ्री स्टाईल रिले आणि मिडल रिले प्रकारात सहभागी होणार आहे.
इमानी मूळची टिळकवाडीची रहिवाशी असून के एल एस शाळेची विद्यार्थीनी आहे.तिला गोवा वेस स्विमर्स क्लबचे प्रसाद तेंडुलकर आदींचे मार्गदर्शन लाभले आहे.