वडगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर मंदिरात बेळगाव येथील रयत संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्याध्यक्ष चंद्रशेखर कोडीहल्ली उपस्थित होते. याचबरोबर जिल्हाध्यक्ष सत्याप्पा मलापुर, राज्य कार्यदर्शीभीमसिंग गडदी, हसिरू क्रांती सेनेचे संचालक गणपती इसीगेर, गोपाळ कुकनूर, रवी पाटील, संजू पुजारी, भरमु समलपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चंद्रशेखर कोडीहळी यांनी बेळगाव सध्या सुरू असलेल्या हलग मच्छे बायपास रस्ता विरोधात जोरदार आंदोलन छेडून येथील शेतकऱ्यांना जमिनी वापस करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. याचबरोबर बल्लारी नाल्यातील खोदाई आणि शेतकऱ्यांच्या उतारावर नॉकर्स असलेला उल्लेख काढून टाकण्यासाठी यापुढे जोरदार आंदोलन करण्याचे सांगितले. रिंग रोडसाठी ताब्यात घेतलेल्या जमिनी अनेकांच्या मुळावर उठले आहेत. यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन झाला आहे. या जमीनी परत मिळवून देण्यासाठी राज्यात जोरदार आंदोलन छेडून संबंधितांच्या जमीनी परत मिळवून देईन असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले आहे.
नवीन स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी ह भ प नरसु निटूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी मोनाप्पा बाळेकुंद्री, अनिल अंनगोळकर, महादेव पाटील, रमाकांत बाळेकुंद्री, गणपती खनुकर, गंगाधर बिर्जे, शिवाजी तारीहाळकर, सुभाष चौगुले, शिवाजी मजुकर, गंगाधर पाटील, लक्ष्मण शिंदे, सर्वज्ञ भुमन्नावर, यल्लाप्पा तारीहाळकर, रामचंद्र शिंदे, तुकाराम जुवेकर यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.