बेळगाव शहरातील अनेक प्रसिद्ध देवी पैकी श्री कोलकांमा देवी होय ही जागृत देवी नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. या देवीचे मंदिर कपिलेश्वर मंदिराच्या मागे आहे .या देवीचा प्रथम जीर्णोद्धार स्थापना 1841 झाला होता शहरात लहान मुलांना सांसर्गिक रोग होऊ नये म्हणून देवीला नवस करतात फेडतात त्यामुळे ही देवी खूप प्रसिद्ध आहे विशेष समाजातील सर्व जाती जमाती मध्ये या देवीला पूजतात.
मराठा समाजामध्ये या देवीला कोलकांमा म्हणतात, लंहान मुलांना गोवर, वारेफोड, खरूज, खोकला या सारखे सांसर्गिक रोग झाल्यानंतर या देवीला दही भाताचा नैवेद्य व ओटी भरतात.डोंबारी समाजातील लोक स्वच्छतेची काम करताना कचरा घाणीमध्ये वावरतात, आपल्या मुलांना रोगराई पासून दूर ठेवण्यासाठी दरवर्षी मे महिन्यात जत्रा करतात.
कुरबुर लोक आपल्या बकऱ्यांचा देवी, वारेफोड, गोवर यांची लागण होऊ नये म्हणून मागणी करतात. बकरी कोंबडे कापून नैवेद्य करतात. कुरबुर लोक या देवीला मैलकव्वा म्हणून संबोधतात.मारवाडी समाज या देवीला सितला देवी म्हणून संबोधतात. सितला सप्तमीला दही दुधाने अभिषेक करून या देवीची मोठ्या प्रमाणात उत्सवात पूजा करतात.
कारवारी सोनार समाज या देवीला कालीका देवी म्हणतात व दर अमावसेला पूजा करतात कपिलेश्वर रोड, तांगडी गल्ली परिसरातील लोक दसरा झाल्यानंतर या देवीची जत्रा मोठ्या प्रमाणावर करतात.चव्हाण कुटुंबीय या देवीची पूजा व्यवस्था गेल्या पाच पिढ्यापासून बघतात.