बेळगाव तालुक्यातील सुळेभावी येथे ऊसाच्या मळ्यात अंदाजे नऊ फुट लांबीचा अजगर सापडला आहे. सर्प मित्र आनंद चिट्टी दाम्पत्याने त्याला पकडून जीवनदान दिले आहे. अजगर हा साप सहसा बेळगाव तालुक्यात सापडत नाही. पण गुरुवारी हा दुर्मिळ साप आढळल्याने बघ्यांनी गर्दी मोट्या प्रमाणात झाली केली होती.
सुळेभावी येथील बेळळारी नाल्या लगत अशोक मंडू यांच्या ऊसाच्या शेतात हा साप आढळला असून ते शेतात गेले त्यांना हा साप दिसला आहे. त्यांनी सर्प मित्र आनंद चिट्टी आणि निर्झरा चिट्टी यांनी कल्पना दिली. त्या चिट्टी दाम्पत्यानी हा साप पकडला अन त्याला जीवनदान दिले आहे.
सहसा बेळगाव भागात अजगर आढळत नाही. या भागात अजगर दुर्मिळ आढळतो. काही वर्षांपूर्वी बेळगावं शहरात अजगर पकडला होता. बाहेरून शहरात माती आण्यात आली होती. त्या मातीतून आला होता तो साप आला होता. या नंतर 2015 मध्ये कुसमळी येथे 12 फूट लांब अजगर पकडला होता. त्या नंतर हा अजगर चिट्ठी यांनी पकडला आहे. ही अतिशय दुर्मिळ घटना आहे, अशी माहिती सर्प मित्र आनंद चिट्टी यांनी बेळगाव Live शी बोलताना दिली.
आनंद चिट्टी यांनी गेल्या 15 वर्षात 15 हजार हुन अधिक विविध प्रकारचे साप पकडून त्यांना जीवदान दिल आहे. केवळ आनंदच नव्हे तर त्यांच्या पत्नी निर्झरा या देखील सर्प मित्र असून त्या देखील आनंद यांच्या सोबत साप पकडून त्यांना जीवनदान देत असतात.
या सर्प मित्र दाम्पत्याने सोशल मीडिया यु ट्यूबवर सुरू केलेलं सापा विषयीचे चॅनेल खूप लोकप्रिय झाले आहे. आता बेळगाव तालुक्यात सापडणे अनेकांची नजरिया सहभाग लागून होती मात्र चिट्टी परिवाराने त्यांना जीवदान दिल्याने अनेक आतून समाधान व्यक्त होत आहे.