बेळगाव स्मार्ट सिटी लि कंपनी आता शहरात नऊ ठिकाणी स्मार्ट पोल बसविण्याचा निर्णय घेतला असून या स्मार्ट पोलमुळे जनतेला विविध प्रकारची माहिती मिळणार आहे.
या पोलवर एक इमर्जन्सी बटण असणार असून हे बटण दाबल्यास तत्काळ संदेश कमांड कंट्रोल सेंटरला जाईल आणि लगेच पोलिसांना तो संदेश पाठवला जाणार आहे.या पोलवर मोठे एल ई डी स्क्रीन लावण्यात येणार असून त्यावर वाहतुकीची माहिती आणि अन्य जनतेला उपयुक्त माहिती दाखविण्यात येईल.
ट्रॅफिक जॅम असेल तर त्याची माहिती स्क्रीनवर येईल त्यामुळे वाहनचालक आपण कोणत्या मार्गाने जायचे याचा निर्णय घेऊ शकतील.हवा कशी आहे,आर्द्रता किती आहे,तापमान किती आहे याची माहितीही पोलवर दिली जाणार आहे.
या पोलवरून शहरातील हॉटस्पॉट देखील नियंत्रित केले जाणार आहेत.राणी चन्नमा सर्कल,कृष्णदेवराय सर्कल,अशोक सर्कलधर्मवीर संभाजी चौक,गोगटे सर्कल,बसवेश्वर सर्कल,नाथ पै सर्कल,आर पी डी क्रॉस आणि मंडोळी रोड येथे हे स्मार्ट पोल बसविण्यात येणार आहेत.