बेळगावचे मर्चंट नेव्हीतील कॅप्टन नितीन धोंड यांना ‘कशती विभूषण ‘अर्थात ट्रेजर ऑफ शिपिंग हा मानाचा पुरस्कार अलीकडेच दिल्लीमध्ये प्रदान करण्यात आला आहे.
नितीन धोंड यांनी गेल्या चार दशकात भारतीय नौकानयन क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीची दखल घेऊन मॅरेक्स मीडिया प्रा.लि. ने हा मानाचा पुरस्कार नितीन धोंड यांना दिला आहे.
नितीन धोंड हे गेल्या चाळीस वर्षाहून अधिक काळ मर्चंट नेव्हीत कार्यरत असून पंचवीस वर्षाहून अधिक काळ ते ऑइल टँकर आणि गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरच्या व्यवस्थापनात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
नितीन यांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टी एस राजेंद्र नेव्हल अकादमीतून शिक्षण घेतले आहे.त्यांच्या पाठीशी समुद्र सफरीचा प्रदीर्घ अनुभव असून एक अभ्यासू आणि अनुभवी कॅप्टन म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.अँग्रीया बोटीद्वारे नितीन यांनी मुंबई ते गोवा प्रवासी बोट सुरू केली आहे.एक निसर्गप्रेमी म्हणूनही नितीन धोंड परिचित आहेत.