बेळगावात बुधवार पासून सुरू असलेल्या सैन्य भरतीत महाराष्ट्रातून हजारो युवक दाखल झाले आहेत.पहिला दिवस महाराष्ट्रातील युवकांसाठी होता कोकण विदर्भ मराठवाडा सह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन युवक मिलिटरी भर्ती साठी बेळगावात दाखल झाले होते मंगळवारी रात्री पासून शहर कॅम्प भागात युवक थव्या थव्याने फिरत होते अश्या युवकांना अल्पोपहार देऊन मदत करण्याचे काम श्रीराम सेना हिंदुस्थान आणि कोनवाळ गल्ली बॉईज या संघटनेच्या युवकांनी केले आहे.
श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी रात्री तीन वाजता कॅम्प मध्ये जाऊन 8 हजार हुन अधिक युवकांना चहा बिस्किटे नाष्टा अल्पोपहार दिला.राष्ट्रीय मिलिटरी स्कुलच्या मैदानावर मद्रास महार बटालियन व पॅरा बटालियन ची भर्ती आहे आगामी 9 नोव्हेंबर पर्यंत ही भर्ती होणार आहे.
हजारोच्या संख्येने युवक दाखल झाल्याने त्यांची सोय होत नव्हती त्यांना जेवण मिळतं नव्हते अश्या गोंधळी गल्लीतील युवकांनी पुलाव्याची स्पाय देखील बुधवारी रात्री केली होती.सदर युवकांना अल्पोपहार देऊन देशरक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या युवकांना एक प्रकारे प्रोत्साहन देण्याचे काम श्रीराम सेना व गोंधली गल्लीतील युवकांनी केल आहे