उडानच्या समावेश्या नंतर सांबरा विमानतळावरील विमानफेऱ्यांना प्रवाश्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात 21175 प्रवाश्यानी विमानप्रवास केला. आगामी दोन महिन्यात आणखी 8 ते 10 फेऱ्या सुरू होणार असल्याने प्रवाश्यांचा टप्पा अर्धशतकच्या पुढे गेल्यास आश्चर्य वाटायला नको.
जानेवारी महिन्यात ‘उडान’ योजनेत सांबरा विमानतळाचा समावेश झाला आणि विमानतळाला उर्जितावस्था मिळली.
सांबरा विमानतळावरून एप्रिल ते ऑगस्ट या 5 महिन्यात तब्बल 1564 विमनफेऱ्या झाल्या आहेत. या कालावधीत 72468 जणांनी विमानप्रवास केला आहे. तर मागच्या एका महिन्यात 412 विमानांनी या ठिकाणाहून उड्डाण केले. एका ऑगस्ट महिन्यात 21,175 प्रवाश्यांनी हवाई प्रवास केला.
सांबरा विमानतळावरूनसध्या बंगळूरला पाच, मुंबईला दोन, पुणे, हैद्राबाद आणि अहमदाबाद या शहरांना प्रत्येकी एक फेरी सुरू आहे.
आगामी काळात इंडिगो, स्पा ई स जेट, ट्रू जेट, एअर इंडिया आदी कंपन्यांच्या अनेक शह राणा वनसेवा सुरू होणार आहेत. त्यामध्ये म्हैसूर, कडप्पा, हैद्राबाद तिरुपती, सुरत, इंदोर, जोधपूर, जयपूर, नासिक, नागपूर ता शहरांना सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.