आगामी पोटनिवडणुकीत भाजपला सत्ता टिकविण्यासाठी सात आमदार निवडून आणणे आवश्यक आहे.भाजपमध्ये बंडखोरी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी गोकाकचे अशोक पुजारी याना सीमा रक्षण समितीचे अध्यक्षपद आणि कागवाडचे माजी आमदार राजू कागे याना काडाचे अध्यक्षपद दिले आहे.पण या दोघांनीही ही पदे स्वीकारण्यास नकार दिला आहे.दोघांनाही निवडणूक लढवून आमदार व्हायचे आहे.
गोकाकामधून यापूर्वी अशोक पुजार यांनी दोन वेळा निवडणूक लढवली होती पण त्यात त्यांना यश आले नाही.कागवाडचे राजू कागे यांनी तीन वेळा आमदारकी भोगली आहे.गोकाकामधून रमेश जारकीहोळी किंवा त्यांच्यातर्फे अन्य कोणी निवडणूक लढवल्यास अशोक पुजारी बंडखोरी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य भाजप नेतृत्वाची धाकधूक वाढली आहे एकीकडे केंद्रीय भाजप नेतृत्व राज्य भाजप सरकारला 100 टक्के प्रतिसाद देत नसल्याच्या बाबी समोर आलेत तर दुसरी या दोन्ही इच्छुकांनी पद नाकारली आहेत
कागवाड मतदार संघात सर्वोच्च न्यायालयाने जर अपात्र आमदारांना निवडणूक लढवण्यास परवानगी दिली तर तेथील श्रीमंत पाटील निवडणूक लढवू शकतात.अन्यथा त्यांचा मुलगा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.पण श्रीमंत पाटील विरोधात राजू कागे बंडखोरी करण्याची शक्यता अधिक आहे.त्यामुळे पोट निवडणुकीत आमदारांना निवडून आणून सत्ता टिकविण्यासाठी भाजपला अधिक घाम गाळावा लागणार आहे.