शंभरहून अधिक घरफोड्या करणाऱ्या कुख्यात आंतरराज्य चोराला एपीएमसी पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.या चोरट्याने कर्नाटक,महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये घरफोड्या करून धुमाकूळ घातला होता.पोलिसांनी अटक केलेला चोर विविध नावाने वावरत होता.हा चोर अब्दुल रशीद उर्फ विलियम अब्दुल मजीद उर्फ कैतं शेख उर्फ पोर्टड(५०) या विविध नावाने वावरत होता.हा मूळचा मुंडगोडचा असून सध्या तो गोव्यात राहत होता.
पोलीस इन्सपेक्टर जे .एम.काळीमिर्ची यांनी दिलेल्या माहितीनुसार हा चोर सदाशिवनगर भागात हातात लोखंडी रॉड घेऊन फिरत होता.त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेऊन शनिवारी त्याची चौकशी करण्यात आली.नंतर त्याला न्यायालयात हजर करून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
त्याचे राहण्याचे एकाच ठिकाणी नाही.त्याला आई,वडील,भाऊ,बहीण असे कोणीही नाही.त्यामुळे तो निरनिराळ्या गावात जाऊन घरफोडी करत होता.त्याचे उत्पन्नाचे साधनच चोरी असल्यामुळे खिशातील पैसे संपले की तो चोरी करायचा.कर्नाटकातील शंभरहुन अधिक घरफोड्या त्याने केल्या असल्याचा संशय पोलिसांना आहे.त्याला यापूर्वी देखील पोलिसांनी अटक केली होती पण जामीनवर तो सुटून आला होता.त्याचा निश्चित पत्ता नसल्यामुळे पोलिसांना त्याचा शोध घेणे अवघड झाले होते. त्याने पैशासाठी आपला धर्मही दोनवेळा बदलला आहे.