महाराष्ट्राला पाणी सोडण्याच्या विचारा संदर्भात कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध हुक्केरीचे आमदार उमेश कत्ती यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून ओरड केली आहे.
संकेश्वर येथील हिरा साखर कारखाण्याच्या अतिथी गृहात आपले मत व्यक्त करून कृष्णा बचाव योजनेमध्ये 740 टी एम सी पाण्याचा संपूर्ण वापर होत नसून या पूर्वी जगदिश शेट्टर यांच्या सरकारने 1700 कोटी रुपये राखून ठेवले होते.कर्नाटकाच्या 42 तालुक्याना म्हादाई नदीचे पाणी वरदान ठरणे जरुरीचे आहे मात्र या नदीचा आम्हाला 40 टी एम सी पाण्याचा वापर झाला पाहिजे असे ते म्हणाले जर का म्हादाई चे पाणी देत नसाल तर आम्हाला स्वतंत्र राज्य द्या.
मुख्यमंत्र्यांचा निषेध
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलताना आमदार उमेश कत्ती म्हणाले की म्हादाई योजना मंजूर होऊन सात वर्षे पूर्ण झाली तरी त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र कोणतेही काम केलेले नसताना महाराष्ट्राला पाणी देतो असे वक्तव्य करणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा मी निषेध करतो असे त्यांनी सांगितले.
आमच्या भागाला योग्य रित्या पाणी दिले गेले नाही तर आम्हाला स्वतंत्र राज्य देण्याची त्यांनी यावेळी मागणी केली.
या भागावर जर अन्याय झाला तर मी मरतो पर्यंत माझा हा लढा सुरूच राहणार.एवढेच नव्हे तर निवडणुका जवळ आल्या की पाणी सोडतो असे हळुवारपणे वक्तव्य केले जाते कोल्हापूर सांगली कराड सोलापूर व उत्तर कर्नाटकातील जिल्हे समाविष्ट करून स्वतंत्र राज्य निर्माण करा मात्र प्रथम आम्हाला पाण्याची सोय करा अशी त्यांनी जोरदार मागणी केली.
400 कोटी रुपये बेळगावात सुवर्ण सौध बांधले गेले मात्र सुवर्ण सौध अधिवेशना विना रिकामे पडले आहे केवळ वोट बँक साठी काहीही वक्तव्ये करणे चुकीचे ठरेल असे ते म्हणाले.