एक आठवड्याच्या आत शहरातील फ्लेक्स,बॅनर अनो बोर्ड हटवून मला त्याचा अहवाल सादर केला पाहिजे असा आदेश प्रादेशिक आयुक्त आणि मनपा प्रशासक आदित्य विश्वास यांनी मनपा आणि स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.
यावेळी त्यांनी मनपा आयुक्त के एच जगदीश यांना धारेवर धरले.मागील अधिकाऱ्यांनी चुका केलेत म्हणून तुम्ही त्याच चुका परत करू नका.युज युवर पावर्स भाई म्हणून मनपा आयुक्तांना त्यांनी सल्ला दिला.तुमच्या पाठीशी मी आहे अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
शहरात अनेक ठिकाणी बांधकाम पाडवल्या नंतर लोखंडी सळ्या आणि काँक्रीट पडलेले दिसून येते.ते संबंधित कंत्राटदाराकडून हटवून शहर स्वच्छ ठेवा.त्यासाठी स्थानिक स्वराज संस्थानी खर्च करण्याची गरज नाही.जुन्या इमारतींचे अवशेष पाच किमी अंतरावर नेऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा आदेश कंत्राटदारांना देण्याची सूचनाही मनपा आयुक्तांना दिली.
मनपा आयुक्तांना बरेच अधिकार आहेत त्याचा वापर करा असेही त्यांनी सांगितले.मनपा आणि स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी समनव्य साधून काम करण्याची आवश्यकता देखील आदित्य विश्वास यांनी व्यक्त केली.बैठकीला मनपा आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी उपस्थित होते.