जिल्हा आयुष्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय आयुर्वेद दिन व्हॅकसिंन डेपो येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चौथा राष्ट्रीय आयुर्वेदिक दिन व धन्वंतरी जयंती यावेळी साजरी करण्यात आली. इंजिनीयर कम्प्युटर अकॅडमीचे अध्यक्ष व योग गुरु रमेश गंगूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
भारतीय आयुर्वेदिक ही संपूर्ण जगाला मिळालेली देणगी आहे. आयुर्वेदिक सहित अनेक भारतीय साहित्य परदेशात गेली व अजूनही त्यांचे अनुकरण केले जाते. आपण आरोग्य संपन्न राहण्यासाठी शरीरातील पंचमहाभूतांचे समतोल राखणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण पंचमहाभूतांचे स्त्रोत असलेल्या निसर्गाची एकरूप झाले पाहिजे असे गंगूर यांनी म्हटले.
डॉक्टर गिरीश होलेंनावर यांनी आयुर्वेदिक वनस्पतींचे संरक्षण व संवर्धन झाले पाहिजे. तसेच आयुर्वेदिक कृषी व्यवसायासाठी शेतकऱ्यांना प्रसार करत त्यामध्ये जागृती करण्याची गरज व्यक्त केली. डॉक्टर देशपांडे यांनी मुक्त जीवन शैलीचे अनारोग्य याला कारणीभूत आहे. बाहेरील फास्टफूड पेक्षा घरातील आहार अति महत्त्वाचा आहे असे सांगितले. अथर्व फाउंडेशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी आपण आयुर्वेदिक विविध संशोधने करत असून ते यशस्वी झाल्याचे सांगितले.