बाल हनुमान तालीम मंडळ कंग्राळी खुर्द आणि शिवमुद्रा ढोल पथक कडोली या दोन्ही गावच्या युवकांनी संयुक्तरित्या स्वच्छता मोहीम राबवत मार्कंडेय नदी स्वच्छ केली आहे. गणेश विसर्जनानंतर कंग्राळी येथील मार्कंडेय नदीत मूर्तींचे निर्माल्य अनेक गणेश मूर्ती ती पडून होत्या त्यामुळे प्रदूषण होत होते.
कंग्राळी खुर्द येथील हनुमान तालीम मंडळ व कडोली येथील शिवमुद्रा ढोल पथक या मंडळांच्या युवकांनी रविवारी सकाळी स्वच्छता मोहीम हाती घेत कंग्राळी खुर्द येथील मार्कंडेय नदीचा परिसर स्वच्छ केला विसर्जन केलेल्या मूर्ती आणि निर्माल्य बाजूला काढले.
प्रदूषण पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन किंवा ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे गरजेचे असते मात्र मार्कंडेय नदीच्या स्वच्छतेची गरज ओळखून कंग्राळी आणि कडोली येथील या युवकांनी स्वच्छता मोहीम राबवून इतरां समोर आदर्श निर्माण केला आहे.
याअगोदर बेळगाव शहरातील शाहूनगर असो हनुमान नगर किंवा के एल ई कडील ड्रिनेज मिश्रित पाणी मार्कंडेय नदीत मिसळल्याने अगोदरच पाणी दुषित बनले आहे त्यातचं गणेश मूर्ती आणि निर्माल्य झाल्यामुळे पाणी पुन्हा दूषित होत होते मात्र या युवकांनी ही मोहीम राबवून नदी स्वच्छ करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे.