पाणी आणि पुरा बद्दल दोन्ही राज्यात समन्वय व्हावा यासाठी कर्नाटक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकत्र येत आहेत सुदैवाने दोघेही एकाच पक्षाचे आहेत त्यामुळे पाण्या बरोबर गेली 65 वर्षे प्रलंबित असलेला आणि बेळगावातील मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा असलेल्या सीमा प्रश्नाबद्दल ही दोघांनी चर्चा करावी अशी मागणी केली जात आहे.
बेळगाव सीमा प्रश्न कोर्टा बाहेर चर्चेने देखील सोडवता येऊ शकतो दोन्ही राज्यांत आणि विशेष म्हणजे केंद्रात तिन्ही ठिकाणी एकाच पक्षाचे सरकार आहे त्यामुळे चांगला समन्वय होऊ शकतो यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पाऊल पुढे टाकावे अशी मागणी सीमा भागातून केली जात आहे.
कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमारेषेवरील जिल्ह्यांत निर्माण झालेली पूरस्थिती व नुकसान पुन्हा पुन्हा उद्भवू नये यासाठी आंतरराज्य समन्वय समिती स्थापन करण्याची मागणी झाली आहे. यासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची बैठक उद्या मंगळवारी मुंबई मंत्रालयात होणार आहे.
कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि महाराष्ट्रातील इतर मंत्रीही या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. कोयनेच्या विसर्गाने पूर आला हा कर्नाटकाचा आरोप आहे तर आलमट्टी धरणाच्या बॅक वॉटरने नुकसान केले हा महाराष्ट्राचा आरोप असून याबद्दल बैठकीत ठोस चर्चा होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.