गणपतीची आरती करताना गणपतीच्या डोळ्यातून पाणी आल्याची घटना जुने बेळगावमधील कृष्णा कल्लाप्पा पाटील यांच्या घरी घडली आहे.घरात आरती करताना दोन ओळी म्हंटल्यावर घरातील व्यक्तीला गणपतीच्या डोळ्यातून पाणी येत असल्याचे दिसले.
प्रारंभी उजव्या डोळ्यातून थेंब थेंब पाणी आले नंतर डाव्या डोळ्यातून देखील पाण्याचे थेंब यायला लागले.दुपारी साडेतीनला पाणी येण्यास प्रारंभ झाला.नंतर भटजींना बोलावण्यात आले.भटजींनी गणपतीच्या डोळ्यातून येणारे पाणी पुसले पण पुन्हा डोळ्यातून पाणी यायला लागले.
शेवटी साडेसहाला गणपतीचे विसर्जन करण्यात आले.गणपतीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलेली घटना गल्लीत कळताच लोकांनी ते पाहण्यास गर्दी केली होती.
गणेश विसर्जन रोजी बाप्पा चालले आपल्या गावाला असे म्हणत गणेश भक्तांच्या डोळ्यात अश्रू पाहिले आहेत मात्र जुने बेळगाव मध्ये चक्क बाप्पाच्या डोळ्यात अश्रू आलेले प्रथमच पाहिले आहे.