मागील दोन महिन्यापूर्वीच तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी म्हणून मल्लिकार्जुन कलादगी यांची निवड झाली आहे. मात्र सरकार बदलले की राजकारण बदलते. त्यामुळे याच राजकारणाचा एक भाग म्हणून नुकतीच रुजू झालेल्या तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात अनेक नेत्यांनी आणि काही त्यांच्या मुजोरी करणाऱ्यांनी कलादगी यांच्या बदलीचे प्रयत्न जोरदार सुरू केले आहेत. यामुळे तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.
तालुका पंचायतीचा कारभार सुटसुटीत व्हावा यासाठी त्यांनी रात्रंदिवस तमा न बाळगता काम केले आहे. पूर परिस्थिती तर त्यांनी तालुका पंचायती मधील कर्मचाऱ्यांना सुट्टी न देता कामाला जुंपले होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल सध्या तालुक्यात आत्मीयता वाढत आहे. मात्र त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न करण्यात येत असल्याने एकच खळबळ माजली आहे.
तालुका पंचायतमध्ये मागील वर्षभरात तीन कार्यकारी अधिकारी झाले एस. के. पाटील त्यानंतर पद्मजा पाटील आणि आता त्यानंतर मल्लिकार्जुन कलादगी हे सध्या कार्यभार सांभाळत आहेत. मात्र त्यांच्या बदलीसाठी होणारे प्रयत्न पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला हे. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ते सध्या कार्यरत आहे.त मात्र काही राजकारण्यांनी त्यांच्या बदलीसाठी अनेक डावपेच सुरू केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
काँग्रेसचे सरकार नुकतीच पडले आहे आणि भाजपचे सरकार राज्यात आहे. मात्र काही राजकारणी नेत्यांनी अनेक अधिकाऱ्यांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नाराजी असून सध्या तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू असलेले मल्लिकार्जुन कलादगी यांच्या बदलीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र जर त्यांची बदली केल्यास काही पीडीओ आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे याचे परिणाम अनेकांना चांगलेच होणार अशी चिन्हे दिसून येत आहेत. याचा विचार राजकारण्यांनी करण्याची गरज आहे असे दिसून येत आहे.