डी एस पी शंकर मारिहाळ आणि अन्य जणांची टीम कारवार सुंकनाळ जंगलातुन बेपत्ता झाली होती सर्व टीम सुखरूप ते सर्वजण सुखरूप आहेत व जंगलातून बाहेर येत आहेत. कारवारचे जिल्हाधिकारी हरीश कुमार यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे.
रविवारी सायंकाळी मल्लापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत कद्रा आणि गारे जंगलात कारवार आणि केंद्र गुप्तचर खात्याचे पथक गेले होते. कैगा जंगलातून आलेला सॅटेलाईट कॉलचे लोकेशन ट्रेस करण्यासाठी जंगलात हे पथक गेले असता तपास करतेवेळी अचानक वाघाने हल्ला केला त्यावेळी सर्व पथक सैरावैरा होऊन विभागले गेले त्यात त्यांची वाट चुकली जंगलात भरकटले होते. त्यानंतर कारवार पोलिसांनी चार पथक नेमून जंगलात तपास सुरू केला होता.
आलेला सॅटेलाईट कॉल कैगा अनुप्रकल्प आणि आय एन एस विराट यांच्या बाबत होता त्यामुळे केंद्रीय आय बी व स्थानिक पोलीस असे 15 जणांचे पथक जंगलात गेले होते.
सध्या कारवारच्या जंगलात भरपूर पाऊस सुरू असून पूर आला आहे त्यामुळे भरकटलेले अधिकारी डॉग स्कॉड,वन अधिकारी पायपीट करत जंगलातुन बाहेर येत आहेत.रात्रभर शंकर मारिहाळ यांचा मोबाईल संपर्क व वायरलेस संपर्क तुटला होता सोमवरी सकाळी डी एस पी मारिहाळ आय बी अधिकारी निश्चल कुमार अन्य टीम तपास पथकाला सापडले असून त्यांनी मोबाईल नेटवर्क मध्ये येताच कारवारचे डी सी आणि एस पी यांना फोन करून आपण सुखरूप असल्याचे कळवले आहे.पोलीस निरीक्षक रमेश हुगार देखील या पथकात असून त्यांनी शंकर मारिहाळ यांच्या सोबतचा सेल्फी पाठवला आहे.
वाघाने हल्ला केल्याने रस्ता चुकून जंगलात भरकटले होते कैगा कडून जंगलात घुसलेले अधिकारी आता कुमुठा जंगलातून फॉरेस्ट गार्ड आणि चौकशी पथकांच्या मदतीने जंगला बाहेर चालत येत आहेत.सोमवारी सायंकाळ पर्यंत ते कारवारला पोचतील.