‘त्या… प्रोफेसरला द्यावा लागला राजीनामा’

0
3444
 belgaum

बेळगाव शहरातील प्रख्यात कायदा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना अश्लील मेसेज करून फोनवर अश्लील बोलणाऱ्या प्राध्यापकाला राजीनामा द्यावा लागला असून त्याने आपले गाव गाठले आहे.

रात्रीच्यावेळी मेसेज करून आणि तुम्हाला मार्क वाढवून देतो मला एकटी येऊन भेटअसे फोन करून हा आंबटशौकीन प्राध्यापक विद्यार्थिनींना सांगत होता.

अनेक दिवसांपासून या महाभागाचा हा प्रकार सुरू होता पण त्याच्याबद्दल तक्रार करण्यास कोणी पुढे येत नव्हते.अखेर दोन मुलींनी धाडस करून श्रीरामसेना(हिंदुस्थान)च्या कार्यकर्त्यांना आंबटशौकीन प्राध्यापक त्रास देत असल्याची तक्रार केली.श्रीरामसेना(हिं.) च्या कार्यकर्त्यांनी कॉलेजच्या प्राचार्यांची भेट घेऊन आंबटशौकीन प्राध्यापका बद्दल तक्रार केली.नंतर त्या प्राध्यापकाला बोलावून विचारणा करण्यात आली.प्रकरण अंगलट येते आणि आपली काही आता धडगत नाही याची खात्री पटताच त्या प्राध्यापकाने राजीनामा दिला.

 belgaum

राजीनामा दिला ते लगेच त्याने आपले गाव गाठले.विद्यार्थिनींना कोणीही त्रास देत असल्यास श्रीरामसेनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.