Sunday, November 17, 2024

/

शरद पवारांच्या पाठीशी मध्यवर्ती समिती

 belgaum

सीमावासीयांच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी असणारे आणि सीमावासियांना नेहमीच पाठबळ देणारे शरद पवार यांच्या प्रतीची बांधिलकी व्यक्त करत त्यांना पाठिंबा म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी निदर्शने केली. सोमवारी सकाळी बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी चौकात निदर्शनं करत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

माजी मुख्यमंत्री आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सीमा प्रश्नासाठी अनमोल योगदान दिले आहे त्यांच्या विरोधात एडी नोटीस बजावण्यात आली आहे याचा विरोध म्हणून समिती नेत्यांनी निदर्शनं करत पवारांना पाठिंबा दर्शवला. यावेळी नोटीस बजावणार्‍या केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आक्रोश व्यक्त करण्यात आला.

Mes backs pawar

अश्या प्रकारे निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकार चुकीचे कृत्य करत असून विनाकारण महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेत्यांना ई डी चा धाक दाखवला जात आहे हे लोकशाहीला धोकादायक आहे. महाराष्ट्रात निवडणूक सुरू आहेत म्हणून जाणून बुजून मुद्दाम ई डी चे निमित्त करून पवारांना केला जात आहे असा आरोप समिती नेत्यांनी केला.शरद पवार सीमावासीय जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत 1986साली झालेल्या कन्नड सक्ती आंदोलनात त्यांनी नेतृत्व केले होते .त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना पाठबळ देणे हे आपले कर्तव्य असल्याचे मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी स्पष्ट केलं.

सुरुवातीला धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला आणि त्यानंतर संभाजी चौकात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.