सध्याच्या परिस्थितीनुसार पोटनिवडणूक किंवा निवडणुका होऊ शकतात .या दृष्टीने काँग्रेस कार्यकर्त्यांनी तयार राहावे असे आवाहन काँग्रेसचे आमदार माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते अथणी कागवाड व इतर मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होऊ शकतात.
किंवा सरकार न टिकल्यास पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल. अथणी मतदारसंघातून सध्या महेश कुमठळी विरोधात पडलेले आणि उपमुख्यमंत्री झालेले लक्ष्मण सवदी निवडणूक लढवू शकतात.
तरी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आता कामाला लागण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुन्हा एकत्र होऊन नव्या जोमाने काम करुया असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला .
निवडणुकीत विजय मिळवला असला तरी नंतर घडलेल्या घडामोडींमुळे सरकारवर पाणी सोडावे लागले असले तरी पुन्हा सरकार काँग्रेसचे होऊ शकते यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.