बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना ई डी ने(इन्फोर्समेंट डायरेक्टर) नोटीस बजावली आहे माजी मंत्री शिवकुमार यांच्या चौकशीमध्ये त्यांना जवळीक असलेल्या लक्ष्मी हेब्बाळकर नोटीस बजावली असून त्यांची चौकशी होणार आहे. ई डी ने दिलेल्या नोटीस अनुसार त्यांना 19 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये पाचारण करण्यात आले असून त्यांची दिल्लीच्या मुख्यालयात चौकशी केली जाणार आहे.
बेकायदेशीर मालमत्ता गोळा केल्या प्रकरणी माजी मंत्री डी के शिवकुमार यांना अटक करण्यात आली असून त्यांची दिल्ली चौकशी सुरू आहे याच प्रकरणात शिव कुमार यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या लक्ष्मी हेब्बाळकर त्यांची चौकशी होणार आहे.
राज्यात मागील वेळी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात डी के शिव कुमार यांच्यावर आयकर खात्याने धाड टाकली होती त्या नंतर लगेच आयकर विभागाने लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या बेळगाव येथील निवासस्थानी देखील खात्याची धाड घातली होती आयकर खात्या नंतर ई डी ने देखील डी के नंतर लक्ष्मी यांची चौकशी सुरु केली आहे.
नुकताच शिवकुमार यांच्या अटकेनंतर बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील हेब्बाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनातआंदोलन केले होते आणि केंद्र सरकारचा निषेध केला होता या शिवाय ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी शिवकुमार यांनी हेब्बाळकर यांना फोन कॉल केला होता फोनवरून संभाषण केले होते हा संशय आल्याने ई डी अधिकाऱ्यांनी ग्रामीण आमदारांची चौकशी चालवली आहे.