बाळेकुंद्री खुर्द येथे पीडीओ म्हणून सेवा बजावणाऱ्या पुनम गाडगे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या कारणाम्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या कारवाईमुळे सर्वच पिडिओ यांचे धाबे दणाणले असून यापुढे भ्रष्टाचार करणाऱ्यांची चांगलीच पंचाईत होणार अशी चिन्हे दिसून येत आहे.
बाळेकुंद्री खुर्द येथे 14 वित्त आयोगातून गाडगे यांनी भ्रष्टाचार केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी के वी राजेंद्र यांनी निलंबनाची कारवाई होण्याची माहिती मिळाली आहे.
याचबरोबर घाडगे यांनी कॅमेरा घेण्यासाठी तब्बल तीन लाख रुपये खर्च केल्याची माहिती उघडकीस आली होती. मात्र त्यावेळी त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई केली नव्हती. नुकत्याच त्यांच्यावर धाड टाकण्यात आली होती. के वी राजेंद्र आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. त्या कारवाईमूळे पूनम या चांगल्या सापडल्याची माहिती मिळाली आहे.
तालुका पंचायत सदस्य यांनीही पूनम गाडगे यांच्या विरोधात आवाज उठविला होता. मात्र त्यांनी याकडे साफ दुर्लक्ष करून काही सदस्यांना हाताशी धरून स्वतःच्या मनमानी कारभार सुरू ठेवला होता. कॅमेऱ्याची तक्रार तालुका पंचायत मध्ये करण्यात आली होती. मात्र याकडे कानाडोळा करत अनेकांनी तिला अभय दिले होते. जिल्हा पंचायतीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांनी केलेल्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या घटनेमुळे तालुक्यातील सर्वच पीडिओमध्ये खळबळ माजली आहे.