सुशृता प्राणिक हिलींग सेंटर बेळगाव यांच्या सहकार्याने व “वन टच हेल्प फाऊंडेशन” जुना गुड्सशेड रोड बेळगाव यांच्या पुढाकाराने जांबोटी रोड चिखले या गावातून जवळ जवळ 8 किलो मिटर घनदाट जंगलातून पायी चालत ,तिकडे जायला ना व्यवस्थीत ना रस्ता , ना बस , ना गाडी , तिकडे कशाचीही सोय नाही अशा एका दुर्गम भागात तिथे 60 कूटुंबाची वस्ती वसलेलं छोटेसे अतिशय गरिब , पण सुंदर स्वच्छ “आमगाव” असे त्या गावचे नाव आहे.
अशा दुर्गम दुर्लक्षित गांवामधे वन टच फाऊंडेशनचे कार्यकर्ते जाऊन तेथील प्रत्येक कूटुंबाला 20 दिवस पुरेल इतके गृहपयोगी आहारधान्य साहित्य त्यामधे तांदुळ , तूरडाळ , मटर , साखर, चहापावडर , कोलगेट, ब्रश, साबण, तिखट , मिठ, तेल पाकीट, साडी, ब्लँकेट चादर , देऊन खरोखर माणसाने माणसामधील माणुसकी ओळखण्याचे कार्य कसे असावे हे दाखवून दिले आहे.
याअगोदर संस्थेच्या माध्यमातून पूरग्रस्तांच्यासाठी अनेक ठिकाणी गावोगावी जाऊन निस्वार्थपणे मदतनिधी साहित्य पोचविले आहे. याबद्दल संस्थेच्या कार्याचे अनेक थरातून कौतुक होत आहे. या संस्थेला सतत ” एक हात मदतीचा ” या वाक्याप्रमाणे सौ.सुषमा पाटील , स्मिता मांगले, इंदिरा जोशी , मयुरी मिर्जी , सुशांत शानभाग व मित्रपरिवार , यांचेकडून मोलाचे सहकार्य मदत मिळत आहे .
तसेच निलजी येथील.भरत बाबू पाटील (गोवा) , विनायक कलापा पाटील , नवयुवक सा.गणेश ऊत्सव मंडळ निलजी , नारायण कृष्णा पाटील , सागर भुजंग पाटील , प्रकाश रामा पाटील , प्रभाकर पाटील , बाळाराम धानगावडे , समीर मुल्ला , समीर दोड्डनावर ,सागर कडेमनी, दिनेश पिसे ,यल्लोजी पाटील , रामचंद्र मून्नोळकर , योगेश पाटील , आर के.ग्रुप , महादेव दामोदर , अशा अनेक दानशूर व्यक्तीनी या संस्थेला सढळ हस्ते आहारधान्य देऊन मदत केली आहे. त्याबद्दल संस्थेचे सेक्रेटरी मनोहर बुक्क्याळकर यानी प्रथम त्यांचे आभार मानले. या कार्यात श्री.शटूप्पा पाटील ,जयप्रकाश बेळगावकर ,नारायण कांगले , संतोष गंधवाले , शिल्पा केकरे , वैष्णवी मुळीक ,वासंता मुळीक , व अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील सहभागी होते..