Thursday, December 26, 2024

/

बेळगावातील हिवाळी अधिवेशन रद्द

 belgaum

गेली कित्येक वर्ष बेळगावातील सुवर्ण सौध मध्ये होणारे कर्नाटक सरकारचे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यावर्षी होणार नाही आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी याबाबत एक वक्तव्य केले असून त्यांनी बेळगाव मधील अधिवेशन रद्द केले आहे.
बेळगाव सह उत्तर कर्नाटकातील पूरग्रस्त भागासाठी अध्याप केंद्राने कोणताच निधी मंजूर केला नसल्याने मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा सध्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर नाराज आहेत त्यातच पुरग्रस्तांना म्हणावी तेवढी शासकीय मदत न दिल्याने नाराजी ओढवून घेण्यापेक्षा त्यांनी हिवाळी अधिवेशनच न घेणे पसंत केलं आहे.

गुलबर्गा येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. कर्नाटक सरकार गेल्या 2006 पासून दरवर्षी बेळगावातील सुवर्ण सौध या इमारतीत अधिवेशन भरवता आलय आता त्याला खंड पडणार आहे. बेळगाव जिल्ह्यात झालेला मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेला पूर या निमित्ताने या वर्षी बेळगावात हिवाळी अधिवेशन होणार नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय.

SUvarna soudha
बेळगाव जिल्हा प्रशासन अजूनही पूरग्रस्तांना मदत करण्यात व्यस्त आहे त्यामुळे देखील अधिवेशन काळात समस्या निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला गेल्याचे देखील ते म्हणाले. पूरग्रस्तांसाठी निधी द्या या मागणीसाठी बेळगावात सध्या शेतकरी संतप्त झाले असताना असताना दुसरीकडे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी बेळगावात अधिवेशन घेणार नसल्याचं जाहीर केले आहे.

यावर्षी जर बेळगावात अधिवेशन झाले तर पुरात मदत न मिळालेले नाराज शेतकरी सामाजिक संस्था आणि इतर लोकांचे सुवर्ण सौध समोर मोठ्या प्रमाणात आंदोलन होऊ शकतं इतकेच काय तर पूरग्रस्तांना निधी देण्यामध्ये कर्नाटक सरकारला अध्यापनअपयश आलेले आहे त्याचा फटका सरकार वर या बेळगाव हिवाळी अधिवेशनात होऊ शकतो म्हणून मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी बेळगावचे विधिमंडळ अधिवेशन रद्द केले आहे.

जिल्हा प्रशासनाची यंत्रणा पूरग्रस्त मदत कामात लागली आहे त्यामुळे तिथे अधिवेशन घेऊन अशी विनंती बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती त्याला अनुसरून आम्ही हा निर्णय घेतलाय असे येडीयुराप्पा म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.