नेहरू नगर भागात एका युवकाने रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीची छेडछाड केली असता सदर युवतीने स्थानिकांची मदत घेत सदर युवकाला चांगलीच अद्दल घडवली अन शेवटी त्या छेडछाड विराच्या आईला माफी मागावी लागली.
रस्त्यावर जाणाऱ्या मुलीची कळ एकाने काढली लागलीच पीडित युवतीने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना छेडछाड माहिती दिली असता गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धारेवर धरले. अखेर त्यांच्या आईने येऊन माफी मागितल्यानंतर प्रकरण मिटविण्यात आले आहे.
सध्या महिला भगिनी व युवती गणपती पाहण्यासाठी शहरात फिरत असताना त्यांचे छेडछाड करण्याचे प्रकार होऊ नयेत यासाठी जागृतीची गरज असून पोलिसांनी या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे. मंडप आणि परिसरात महिला व पुरुष अशी स्वतंत्र व्यवस्था ठेवून कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी अशी मागणी होत आहे.