चार महिन्यापासून पगार न झाल्याने डेंगू या आजारावर उपचार होऊ शकला नाही आणि त्यामुळेच आमचा सफाई कामगार दगावला आहे असा आरोप सफाई कामगारांनी केला आहे. सोमवारी सकाळी सफाई कामगारांनी आपले काम बंद आंदोलन करत एका खाजगी हॉस्पिटल समोर बेळगाव मनपाच्या च्या विरोधात निदर्शने केली त्यावेळी हा आरोप केला.
अनिल कांबळे व 28 वर्षे रा.वंटमुरी कॉलनी बेळगाव या सफाई कामगाराचा डेंग्यू मुळे मृत्यू झालाय मनपाने पगार न दिल्याने योग्य उपचार होऊ शकले नाहीत त्याविरोधात सफाई कामगार चांगलेच आक्रमक झाले होते.
अनिल हा गेल्या कित्येक दिवसापासून आजारी होता आजारपणात त्याने गणेश चतुर्थी काळात सकाळच्या वेळी काम देखील केले होते मात्र त्याची तब्येत जास्तच बिघडल्याने त्याला उपचारासाठी मेटगुड इस्पितळात दाखल करण्यात आले होते त्याला डेंग्यू झाला होता अधिक उपचारासाठी डॉक्टरांनी अन्य हॉस्पिटल मध्ये घेऊन जा असे सांगितले होते मात्र त्याच्याकडे उपचारासाठी पैसे नसल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला आहे गेल्या चार महिन्यापासून बेळगाव मनपाने पगार दिला याला मनपा जबाबदार आहे असा आरोप कामगारांनी केला आहे.
मनपाच्या चुकीमुळे सफाई कामगाराचा मृत्यू झाला असला तरी मात्र याकडे कुणी मनपाचा अधिकारी फिरकला देखील नाही त्याबाबत देखील सफाई कामगारांनी नाराजी व्यक्त केली.
शहराला स्मार्ट करायला निघालेल्या बेळगाव मनपा प्रशासनाला शहर स्वच्छ करणाऱ्या सफाई कामगारांचा पगार वेळेत येत नाही त्याला जबाबदार कोण? सफाई कामगारावर किती दिवसअन्याय होणार असा सवाल देखील सफाई कामगारांनी यावेळी केला.