Monday, November 25, 2024

/

मंडोळी रोडच्या दुरावस्थेत नागरिक हैराण

 belgaum

गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ उलटला तरी स्मार्ट सिटी योजनेत सुरू झालेल्या मंडोळी रोडचे काम पूर्ण झालेले नाही.विकासाची कामे बेळगाव शहरात अतिशय धीम्या गतीने सुरू आहेत. याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत आहे. प्रशासकीय व्यवस्थेच्या दुर्लक्ष व दिरंगाईचे फटके नागरिकांना बसत असून नागरिक हैराण झाले आहेत.

स्मार्ट सिटी योजनेतील मंडळी रोड तयार करण्याच्या प्रक्रियेत दुरावस्था आल्यामुळे नागरिक सध्‍या हैराण झाले आहेत. अशा रस्त्यावरून जाणे म्हणजे नागरिकांच्या जिवाला धोका असून लवकरात लवकर हा रस्ता करण्यात यावा. अशी मागणी होत आहे.

Mandoli road
रस्ता पूर्ण झालेला नसल्यामुळे बाजूला मातीचा रस्ता करण्यात आला असून तेथून दोन वर्षांपासून वाहतूक सुरू आहे.पाऊस पडल्यावर तेथे चिखल होत असून त्रासदायक झाले आहे.रात्रीच्या वेळी दुचाकी घेऊन मंडोळी रोडवरून जाणे म्हणजे जीव देण्याचा प्रकार असल्याचे येथील नागरिक सांगतात. मागील एका आठवड्यातच या रस्त्यावर 12 ते 15 अपघात झाले .लोखंडी रॉड तसेच पडून आहेत .

रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे मारले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून जाणे धोकादायक आहे. स्मार्ट सिटी योजनेतून या रस्त्याचे काम पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षे लागतील. पहिलाचा रस्ता बरा होता. असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

प्रशासकीय व्यवस्था हा रस्ता लवकर करून घेण्यासाठी प्रयत्न करत नाही. आमच्या जीव धोक्यात घेतला जातो असे नागरिकांचे म्हणणे आहे. याबद्दल स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता नागरिकांनी संयम पाळावा त्यांना फळ नक्कीच मिळेल असे सांगितले जाते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.